जगजीत आणि चित्रा यांचे अल्बम ठरले हिट
1976 चा तो काळ. त्या वेळी 80 हजार रुपये म्हणजे छोटी रक्कम नव्हती. जगजीत – चित्रा यांना जणू काही खजानाच मिळाला होता. भारतातील गझलविश्वातली ती एक खामोश क्रांती होती.
kheliyad.sports@gmail.com | M. +91 80875 64549
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी…
जावेद अख्तर यांनाही ही नज्म खूप आवडते. त्यांनी पहिल्यांदा ही नज्म ऐकली ती अमिताभ बच्चन यांच्या घरी. त्या वेळी जावेद अख्तर यांचं नेहमीच त्यांच्याकडे येणं-जाणं असायचं. तेही कधी अख्तर यांच्याकडे यायचे. त्या वेळी रविवारी असेच एकदा अमिताभ यांच्या घरी जावेद अख्तर गेले. त्या वेळी अमिताभ त्यांना म्हणाले, ”मी तुम्हाला एक अल्बम ऐकवतो.” त्यांनी तो प्ले केला आणि ही सुरेल नज्म कानी पडली. जावेद अख्तर यांनी पहिल्यांदाच हा आवाज ऐकला. तोपर्यंत जगजीतसिंग ही काय चीज आहे हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं.
जावेद अख्तर यांनी कुतूहलाने विचारलं, “कोण आहेत हे?”
अमिताभ बच्चन म्हणाले, “हे जगजीतसिंग..”
खरोखर जगजीतसिंग यांच्या आवाजातली बात निकली आणि दूर तलक गेली…
त्या वेळी एलपी रेकॉर्ड होणे नव्या कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट होती. ‘अनफॉरगेटेबल्स’ हा अल्बम अविस्मरणीयच होता. तो विस्मरणात कधीच गेला नाही. त्या काळात ही मोठी क्रांती होती. संगीताचा चेहरामोहराच बदलला. अर्थात, या अल्बमची लोकप्रियता पाहायला जगजीत आणि चित्रा भारतातच नव्हते. ते एका शेख यांच्या आमंत्रणावरून कुवेतला गेलेले होते. कुवेतमधील शानदार मैफली गाजवल्यानंतर दुबई, नंतर फ्रँकफर्ट, लंडनला रवाना झाले. सहा महिन्यांनंतर जेव्हा जगजीत आणि चित्रा मायदेशी परतले तेव्हा तर ते थक्कच झाले. ‘अनफॉरगेटेबल्स’ने सगळे विक्रम मोडीत काढले. जगजीत-चित्रा मायदेशी येताच एचएमव्हीने 80 हजारांचा रॉयल्टीचा धनादेश त्यांच्या हाती सोपवला. 1976 चा तो काळ. त्या वेळी 80 हजार रुपये म्हणजे छोटी रक्कम नव्हती. जगजीत-चित्रा यांना जणू काही खजानाच मिळाला होता. भारतातील गझलविश्वातली ती एक खामोश क्रांती होती.
या ‘अनफॉरगेटेबल्स’ अल्बमचे कव्हर चित्र तयार केले होते चित्रा यांचे पहिले पती देबू दत्ता यांनी. या रेकॉर्डचा आणखी एक फायदा झाला. जगजीत यांच्या वडिलांची नाराजी कायमची दूर झाली. आता वडिलांना जगजीतसिंग यांचा अभिमान वाटू लागला. ते स्वतःही जगजीतच्या गझला गुणगुणायचे. एका मुलाला आणखी काय हवं होतं! या वेळी जगजीत यांनी निश्चित केलं, की आता मुलगा विवेकची आजी-आजोबांशीही भेट व्हायला हवी. जगजीत चित्रासोबत लुधियानाला गेले, जेथे त्यांचे आईवडील राहत होते. घरी जगजीत यांचे भरपूर लाडकौतुक झाले. त्यानंतर हा परिवार कोलकात्याला गेला.
लग्नानंतर चित्राच्या आईवडिलांशी जगजीत यांची एकदाही भेट झालेली नव्हती. विशेष म्हणजे, त्यांना चित्राचा घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाचंही माहीत नव्हतं. त्यांना एवढेच माहीत होतं, की चित्रा देबू दत्ता यांच्यासोबत खूश आहे. मात्र, जेव्हा कळलं की चित्राच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत, तेव्हा ते स्तब्धच झाले. मात्र, जगजीतला भेटल्यानंतर त्यांना कल्पना आली, की मुलीने घेतलेला निर्णय चुकीचा नाही. पुढे त्यांनी नेहमीच जगजीत यांना मुलासारखं मानलं.
किशोरावस्थेपासूनच जगजीत यांचा सुफियाना आणि आध्यात्मिकतेकडे अधिक कल होता. शिमल्यात पंजाबचे लोकप्रिय कवी शिवकुमार बटालवी यांना ते भेटले. या भेटीतच जगजीत यांना त्यांच्या कवितांनी अक्षरशः वेड लावलं. त्याच वेळी त्यांच्या मनात एक सुप्त अपेक्षा होती, की कधी तरी आपल्याला बटालवी यांच्या कवितांच्या गायनाची संधी मिळो. आयुष्यात अशा संधी अवश्य येतात जेव्हा तुम्ही शिखराकडे जात असतात, तेव्हा समाज तुमच्या इच्छेपुढे नतमस्तक होतो; पण जोपर्यंत तुम्ही अनोळखी असतात तेव्हा किती तरी इच्छा-आकांक्षा दम तोडतात. ‘अनफॉरगेटेबल्स’ने लोकप्रियतेचे विक्रम मोडल्यानंतर जगजीत सिंग यांनी एचएमव्हीसमोर बटालवी यांच्या कवितांच्या गायनाचा रेकॉर्ड काढण्याचा प्रस्ताव ठेवला. जगजीत सिंग यांच्या लोकप्रियतेमुळे एचएमव्हीचा त्यांच्यावर विश्वास वाढला होता. कंपनीने जगजीत यांच्या प्रस्तावाला लगेच मंजुरीही दिली. जगजीत-चित्रा यांच्या या अल्बमचे नाव होते- ‘बिरहा दा सुलतान सदाबहार.’ या अल्बमचे कव्हर डिझाइन केले होते प्रसिद्ध चित्रकार इमरोज यांनी. हा काळ होता 1978 चा.
जगजीत आणि चित्रा यांचे आयुष्य छान चालले होते. दोघांचेही एकापेक्षा एक हिट अल्बम येत होते. लोक तर त्यांच्या अल्बमचे दिवाने झाले होते. जेवढे ते भारतात लोकप्रिय होते त्यापेक्षा अधिक लोकप्रियतेचे शिखर विदेशात गाठले होते. त्यांच्या लोकप्रिय अल्बममधून एका अल्बमची किंवा गझलेची निवड करणे प्रचंड अवघड आहे. सर्वच अल्बममध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग केले होते. त्या वेळी ‘काळा तवा’ कालबाह्य ठरला आणि ऑडियो कॅसेटने क्रांती घडवली. प्रत्येक कॅसेटचे कव्हर काही पानांचे असायचे. त्यावर सगळ्याच गझला छापलेल्या असायच्या. ही कल्पना जगजीतसिंग यांनीच पहिल्यांदा लोकप्रिय केली. भारतातील घराघरांत गझल पोहोचविण्याची जगजीतसिंग यांची ही कल्पना अद्भुतच म्हणायला हवी. जगजीत- चित्रा यांनी काही गझला अशाही गायल्या, ज्या अल्बमच्या माध्यमातून संगीतप्रेमींपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. त्या अप्रतिम गझलांपैकी एक म्हणजे…
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=1SENVoDyyqI” column_width=”4″]सर जिस पे न झुक जाए उसे दर नहीं कहते
हर दर पे जो झुक जाए उसे सर नहीं कहते
दहा वर्षांत जगजीत आणि चित्रा या दोघांचे 16 अल्बम
‘बिरहा दा सुलतान’नंतरच्या दहा वर्षांत जगजीत आणि चित्रा या दोघांचे 16 अल्बम आले. या सर्व अल्बमनी लोकप्रियतेचे विक्रम रचले. त्यांनी देश-विदेशांत जेवढ्या गझला गायल्या त्या आता कालौघात धूसर होत आहेत. मात्र, विदेशातील काही दर्दी जाणकारांनी त्यांच्या काही गझला आजही जपून ठेवल्या आहेत. भारतातही अनेकांना या गझलांविषयी माहिती नसेल. त्यांच्या अनेक गझला अशा आहेत ज्या विदेशातच गायल्या आहेत. भारतात त्यांनी कधी त्या सादर केलेल्या नाहीत. एका दर्दी रसिकाने त्यांना विचारलं होतं, की ”तुम्ही विदेशात ज्या गझल पेश करतात, त्या भारतात कधी सादर केल्या नाहीत. उलट विदेशात सादर केलेल्या गझल तर किती तरी पटीने सुरेख होत्या. मात्र भारतात तुम्ही पंजाबी धाटणीच्याच गीतांना प्राधान्य दिलं. असं का?” त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, ”ती एक्स्पोर्ट क्वालिटी होती!” जगजीत सिंग यांनी प्रेक्षकांची नस ओळखलेली होती. त्यामुळे कुठे कोणत्या गझलांना दाद मिळेल आणि कोणत्या गझलांना नाही, याची त्यांना कमालीची जाण होती. कदाचित यामुळेच त्यांनी विदेशात गायलेल्या गझला भारतात कधीच सादर केल्या नाहीत. त्यांच्या अनेक रेकॉर्डची लोकप्रियता दूरपर्यंत पोहोचली होती. 1979 मध्ये ‘कम अलाइव्ह इन अ लाइव्ह’ ही रेकॉर्डही प्रचंड गाजली.
जगजीतसिंग यांचे सहयोगी कलाकार साउंड इंजिनीअर दमन सूद यांनीही अल्बमविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणतात, की ‘कम अलाइव्ह..’ ही रेकॉर्डिंग जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा असे वाटेल की आपण लाइव्ह कॉन्सर्ट ऐकतोय. मुळात ती लाइव्ह रेकॉर्डिंग अजिबात नव्हती. जगजीत यांनी स्टुडिओमध्ये लोकांना बोलावून त्यांची उत्स्फूर्त दाद रेकॉर्ड केली. नंतर जगजीतसिंग यांनी गझल रेकॉर्ड करून त्यात लोकांची उत्स्फूर्त दाद मिक्सिंग केली. ही जीनिअस आयडिया जगजीतसिंग यांची होती. म्हणजे काळाची पाऊले त्यांनी किती पूर्वी ओळखली होती. आजही अशा प्रकारची मिक्सिंग होते. मात्र, 80 च्या दशकात असा विचार करणारे जगजीत सिंग काळाच्या किती पुढे होते याचे हे उदाहरण.
तलत अझिझ यांनी 1979 मध्ये ऑल इंडिया रेडिओशी अल्बमचा करार केला, तेव्हा त्यांनी जगजीतसिंग यांचीच मदत घेतली. तलत यांनी जगजीत यांना फोन करून विचारलं, की मी एक अल्बम काढतोय. तुम्ही त्यासाठी कम्पोझिशन्स कराल का? जगजीतसिंग लगेच हो म्हणाले. ‘जगजीतसिंग प्रेझेंट्स तलत अझिझ’ हा तो अल्बम. नंतर ‘मै और मेरी तनहाई’ असे अनेक हिट अल्बम जगजीतसिंग यांनी दिले. उर्दू साहित्यातील लोकप्रिय नाव म्हणजे डॉ. बशीर बद्र. त्यांच्याही अनेक गझला जगजीतसिंग यांनी गायल्या.
(क्रमशः)
Jagmohan to Jagjit singh (part 7) : या आघाताने गझल गायक जगजीत सिंग कोलमडले
Follow on facebook page [jnews_element_socialiconitem social_icon=”facebook” social_url=”https://www.facebook.com/kheliyad”] [jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”104″]
One Comment